कोकण म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं दृष्य म्हणजे निळाशार समुद्र, त्यातील लाटा, किनारपट्टीवरील वाळू, नारळ सुपारीच्या बागा आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा. सुमारे ७२० कि. मी. लांबीची किनारपट्टी लाभलेला हा चिंचोळा प्रदेश समुद्रसपाटीपासून ते सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांपर्यंत वसलेला आहे. यामध्ये ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. हा सर्व भूभाग डोंगराळ …