January February March 2017
Season will change slowly and the summer heat will make its presence unmistakable. During summer months water scarcity is experienced by many. One can save water at home as well as in kitchen garden & home garden. Mulching is an effective way to achieve water saving in kitchen garden, home garden and house plants as well. It can be done with the help of dry leaves or partially decomposed leaves, used gunny cloth etc. This helps in reducing evaporation losses of water from soil. It also helps in controlling weeds. It can even be done for plants in pots.
हळू हळू ऋतू बदलेल आणि उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागेल. अनेक ठिकाणी दर वर्षी पाणी टंचाईची समस्या जाणवते. अशा वेळी उपलब्ध पाण्याचा संवर्धनात्मकरित्या केलेला वापर फार उपयोगी ठरू शकतो. घरगुती पातळीवर तसेच परसबागेतही पाण्याची बचत करणे शक्य आहे. परसबागेतील व कुंडीतील झाडांसाठी पाणी बचत करताना आच्छादन हे एक प्रभावी माध्यम आहे. झाडाच्या भोवती वाळलेल्या पानांचे किंवा अर्धवट कुजलेल्या पालापाचोळ्याचे
किंवा जुन्या गोणीच्या कपड्याचे (बारदानाचे) आच्छादन करता येते. आच्छादनामुळे जमिनीतील पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे झाडाला घातलेले पाणी जास्त काळ मातीत राहून झाडाला उपलब्ध होते. तसेच आच्छादनामुळे झाडाभोवती गवत वाढण्याचे प्रमाण पण खूप कमी होते.
Meet a Plant
Common Name: Golden Shower / Indian Laburnum / बहावा
Botanical Name: Cassia fistula
Family: Fabaceae
Description: This is a medium sized deciduous tree. Hanging clusters of lemon yellow flowers on a leafless tree make it look spectacular. Its pods are long and cylindrical.
Flowering season: April – June
हा मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष आहे. पिवळ्या फुलांचे असंख्य घोस जेव्हा संपूर्ण झाडाला भरून टाकतात तेव्हा हा वृक्ष खूप देखणा दिसतो. याच्या शेंगा लांब असतात.
या झाडाची फुले, पाने व शेंग हे सर्व ‘निसर्गातील घटकांची चित्रे रंगवा २’ या पुस्तकात मुलांना रंगवता येतील. या मालिकेत ३ पुस्तके आहेत. या पुस्तकांबद्दल अधिक माहितीसाठी ही लिंक पहा http://krishivarada.in/about-books/
Children can colour flowers, leaves & pod of this tree from ‘Nature Colouring Activity Book 2’. There are 3 books in this series. To know more about these colouring books see the link http://krishivarada.in/about-books/
Environment Conservation Series
आम्ही गेली काही वर्षे स्वयंपाकघरातील ओला कचरा व घराच्या परिसरातील पालापाचोळा वापरून खत तयार करत आहोत. घरगुती ओल्या कच-यामध्ये आपल्यासाठी अखाद्य असे भाग असले तरी त्यात निसर्गाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे घटक असतात. हे घटक पुनर्चक्रीकरणाच्या माध्यमातून निसर्गाला परत केल्यास निसर्गाचे चक्र पूर्ण होण्यास मदत होऊ

शकते. अशाप्रकारे तयार केलेल्या खतामुळे जमिनीची सुपीकताही वाढू शकते. हे खत घरातील कुंड्यामधील किंवा परिसरातील झाडांना घालता येऊ शकते. आपल्या घरातील ओल्या कच-याचे मूल्यवर्धन जर प्रत्येकाने केले तर घरगुती कच-याची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच नसर्ग संवर्धनाला हातभारही लागेल.
डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेसाठी या वर्षीच्या कृती संशोधन प्रकल्पाच्या ‘माझी पर्यावरणपूरक सवय’ या मुख्य विषयाला धरून अथर्वने ‘घरगुती ओल्या कच-याचे मूल्यवर्धन’ या विषयावर प्रकल्प सादर केला (इयत्ता सहावी). अथर्वने केलेल्या अभ्यासादरम्यान अशा पद्धतीने तयार केलेल्या खताचा पालेभाजीच्या बियाण्याच्या उगवण व वाढीवर सकारात्मक परिणाम दिसून आला.

Since last few years we have been making compost from kitchen waste and leaf litter from our home garden. Even though kitchen waste contains non consumable parts for humans it is not a waste for nature. Rather it contains many nutrients which should be returned to soil in the form of compost. This helps in completing nature’s cycle of nutrients. If everybody converts kitchen waste into compost it will help solving the problem of kitchen waste dumping. It will also help in nature conservation.

Seedlings of leafy vegetables – 3 squares on left side of tray are without using compost while 3 squares on right side of tray are with compost.
Our son Atharva presented his project on value addition of kitchen waste for Dr. Homi Bhabha Young Scientist Exam (Std. 6). During his study and project preparation he found that there was a noticeable difference in germination and growth of seedlings of leafy vegetables where home made compost was used. Photo of seedling tray above clearly shows the result.